सुहासिनी दुग्धप्रक्रिया उद्योग,दर्जा आणि विश्वासार्हतेनेे जोपासलेले आपुलकीचे नाते

व्यवसाय उद्योगात मराठी माणूस फारसा रस घेत नाही,मराठी माणसाला सरकारी नोकरी अधिक प्रीय असते अशी चर्चा सातत्याने होताना दिसून येते पण हे प्रमाण मोडीत काढत अनेक मराठी तरुण निरनिराळ्या व्यवसाय उदयोगात भरारी घेताना दिसून येवू लागले आहेत.अनेक नवनवे आदर्श प्रस्थापित करु लागले आहेत.सरकोली येथील तरूण शशिकांत मधुकर कराळे हे एक असेच नाव.एम.ए.बी.एड् झाल्यानंतर सरकोली येथे विनाअनुदान तत्वावर 2008-2011 पर्यंत भैरवनाथ ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक येथे त्यांनी काम पाहीले पण वेगळ्या वाटा चोखाळत उद्योग व्यवसायात भरारी घेण्याची स्वप्ने स्वस्थ बसू देत नव्हते.अशातच त्यांनी दुग्ध व्यवसाय कशा पध्दतीने करता येईल,यात दर्जा आणि आधूनिकता याचा मेळ घालत ग्राहकांचा विश्वास कसा संपादन केला जावू शकतो,आपण विविध ऊत्पादनाचा दर्जा संभाळला तर जाहीरात करण्याची गरज पडत नाही तर आपले ग्राहकच समाधान व्यक्त करत जातात आणी आपोआप जाहीरात होते नवे ग्राहक जोडले जातात आणि विश्वासाचे नाते आणखी दृढ होत विस्तारले जाते याची मनोमन खात्री पटल्याने दुग्ध व्यवसायाचा पुरेपूर व तंत्रशुध्द अभ्यास करत आधुनिक साधनांची उपलब्धता आणि व्यवस्थापन याची पुरेपूर माहीती संकलीत केल्यानंतर 2011 साली नोकरीचा राजिनामा देवून टाकळी रोड पंढरपूर येथे दुग्धालयाची सुरुवात केली.
सुरुवातीला एक कामगार सोबतीला होता पण हजार हत्तींचे बळ देणारा आत्मविश्वास आणि धडपड,अहोरात्र परिश्रम करण्याची तयारी आणि हे करीत असताना आधुनिकता आणि ग्राहकांची अभिरुची जपण्याबरोबरच शुध्दता आणि स्वच्छता याला प्राध्यान देत गेल्याने व्यवसाय वृध्दींगत होत गेला.ग्राहकांच्या अपेक्षांची पुर्तता होत गेली.ग्राहकांचा विश्वास दृढ होत गेला,वाढत गेला.त्यामुळे घेऊन सुरु केलेला सुहासिनी दुग्धालयाचा व्याप आज एकूण 8 महिला व 14 पुरुष कामगार असे विस्तारत गेला आहे.
आज पंढरपूर शहरात सुहासिनी दुग्धालयाची 3 विक्री केंद्रे आहेत.तीन्ही ठिकाणी ग्राहकांना तोच दर्जा,तीच चव आणि माफक दरात उपलब्ध होत असल्याने सुहासिनी दुग्धालय हा पंढरपूरातील एक लोकप्रिय आणि विश्वसार्ह ब्रँड ठरला.


केरळहुन आलेल्या वर्गिस कुरियन यांनी या देशशातील पारंपारिक दुग्ध व्यसायाला छेद देत गुजरात मधील अडाणी,अनपढ परंतू जिद्दी ग्रामिण कुटूंबाना दुग्ध व्यवसायाशी जोडत त्यांना देशात दुग्ध व्यवसायात क्रांती केली.दर्जा,आधुनिकता आणि विश्वासार्हता या त्रीसुत्रीचा वापर करत अमुल हा ब्रँड बनवला मग आपण गावगाड्यातून आलेला पदवीधर तरूण आहोत आपणही दर्जा आणि विश्वासार्हता जोपासली तर आपला सुहासिनी हा ब्रँड दुग्ध व्यवसायात नक्कीच लोकप्रिय ठरेल हे लक्षात घेत शशिकांत कराळे परिश्रम आणि ध्यास याला आधुनिकतेची जोड दिली.दुधावरती प्रक्रिया करुन दर्जेदार अशा प्रकारे दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, लोणी, चक्का, खवा, गुलाबजामून, पेढा, दहीवडा, आदी पदार्थ बनविले जातात आणि जीभेवर रेंगाळणारी चव आणि ग्राहकांचे समाधान हीच श्रमाची पावती समजत आणखी उमेदिने व्यवसाय वृध्दीसाठी परिश्रम घेत राहील्यानेच सुहासिनी दुग्धालयाच्या पंढरपूर शहरातील तिनही विक्री केंद्राच्या ठिकाणी आपुलकीने येणारा आणि समाधानाने जाणारा मोठा ग्राहक वर्ग दिसून येतो.आणि शशिकांत कराळे यांनी जपलेल्या या आपुलकीच्या नात्यामुळेच काळा मारुती चौक येथील सुहासिनी दुग्धालयाच्या शाखेचा आज प्रथम वर्धापन दिन साजरा केला जात असताना त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुहासिनीचे विविध पदार्थास आज लग्नसमारंभासाठी व इतर कार्यक्रमातही मोठी मागणी होत असल्याचे दिसून येते.लग्नकार्य असून कुठलाही सण समारंभ असो अथवा वाढदिवस आदी मंगल प्रसंगाचे सेलीब्र्रेशन सुहासिनी दुग्धालयातून कुठला पदार्थ आणायचा याचे नियोजन हा नित्याचा भाग झाला आहे आणि त्यापाठीमागे आहे केवळ शशिकांत कराळे यांनी जपलेली विश्वासार्हता.
एकीकडे ग्राहकांना निर्भेळ आणि स्वादिष्ट प्रॉडक्टस उपलब्ध करुन देताना,आपल्या रिटेल आउटलेट मधून ग्राहकांना तीच चव मिळावी,तोच दर्जा मिळावा यासाठी इनलेट तीतकेच महत्वाचे आहे हे ओळखून शशिकांत कराळे यांनी सरकोली, भंडीशेगाव, वाखरी, सुस्ते येथे स्वतंत्र दूध संकलन केंद्रे सुरु केली.निश्चित केलेल्या मानांकनाची खबरदारी घेत संकलन केंद्रातून संकलन केलेले दुध विविध प्रॉडक्टस मध्ये रुपांतरीत केले जात असतान कमी कमी मानवी हस्तक्षेप असला पाहीजे हे लक्षात घेत अत्याधुनिक साधनांचा अभ्यास करत त्याची सुहासिनी दुग्धालयाच्या माद्यमातून पुर्तता केली.ग्राहकांना विकला जाणारा माल हा दर्जेदार करण्यावरती भर दिला.नियमीत स्वच्छता, नियमीतता (सकाळी 6 ते रात्री 10),कामगारांच्या कुशलतेवर लक्ष देण्यात येवू लागले आणि प्रत्येक दिवशी याची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागली.तर पंढरपूरातील रेल्वे स्टेशन, लिंकरोड, इसबावी या परिसरात सतत दहा वर्षे घरपोच दूध पोहोच करता यावे यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली.
मागील वर्षापासून काळा मारुती चौक शाखेत सुरु झालेल्या दहीवड्यास पंढरपूरवासियांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.या शाखेस सुरु होऊन आज 1 जानेवारी रोजी 1 वर्ष पुर्ण होत आहे पण या एक वर्षात आणखी हजारो समाधानी ग्राहक जोडण्याचे काम शशिकांत कराळे यांच्या सुहासिनी दुग्धालयाच्या काळा मारुती शाखेने केले आहे.
शैक्षणिक श्रेत्रात करियर करु पाहणारा एक तरुण काय करु शकतो याचे शशिकांत कराळे हे एक उदाहरण आहे.आणि दर्जामुळे प्राप्त झालेली विश्वासार्हता,विश्वासार्हतेमुळे वाढलेली दर्जा राखण्याबाबतची जबाबदारी,समाधानी ग्राहकांनी व्यक्त केलेल्या आपुलकीमुळे वाढलेली प्रसिध्दी,आणि सुहासिनी दुग्धालयाने जोपासलेला विश्वास हा सुहासिनी दुग्धालयास आणखी यशोशिखरे सर करण्यास मोलाचा ठरणार आहे.सुहासिनी दुग्धालयाच्या काळा मारुती शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
– राजकुमार शहापूरकर

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago