आपल्या प्रियकराला सोबत घेत पतीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेनं त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या प्रियकराची मदत घेत पतीवर खुनी हल्ला केला. त्यात पती ठार झाल्यावर तिने बनाव रचला आणि पतीने आत्महत्या केली, असं दाखवलं. मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील चुरू भागात राहणाऱ्या सरोज नावाच्या महिलेचं रणजीतसोबत लग्न झालं होतं. दोघांमध्ये सतत भांडणं होत होती आणि सरोज अनेकदा माहेरी निघून जात होती. याच काळात तिचं अफेअर सुरेंद्र जाट नावाच्या तरुणासोबत सुरू झालं.
याची रणजीतला कल्पना आल्यावर त्याने याला आक्षेप घेतला आणि दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा सल्ला फेटाळून लावत सरोजनं हे प्रकरण सुरूच ठेवलं होतं. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली आणि सरोजनं पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
प्रियकराच्या मदतीने केला खून
घटनेच्या दिवशी सरोजने सुरेंद्रला घरी बोलावलं आणि पतीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीचा मृतदेह फासावर लटकावला आणि सुरेंद्रला घरी जायला सांगितलं. पहाटेच्या सुमाराला आपल्या पतीनं आत्महत्या केल्याचा आरडाओरडा करत तिने शेजारी आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं.
भावाने केली तक्रार
ही घटना आत्महत्येची आहे, असं प्रथमदर्शनी पोलिसांनाही वाटलं होतं. मात्र रणजीतच्या भावाने सांगितलेल्या काही बाबींनंतर पोलिसांना संशय आला. सरोज ही काही आठवडे घर सोडून निघून गेली होती. बोलावूनही ती येत नव्हती. रणजीतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच ती घरी आली होती. त्याचप्रमाणे घटनेच्या अगोदर काही दिवस सुरेंद्र परिसरात दिसला होता आणि घटनेच्या रात्री एक गाडी रणजीतच्या घरापाशी थांबली होती, अशी माहिती रणजीतच्या भावाने दिली.
सरोजने दिली कबुली
पोलिसांनी या माहितीच्या आधारे कसून चौकशी केल्यावर सरोजने सुरुवातीला आपण खून केल्याचं सांगत सुरेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर दोघांचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…