ताज्याघडामोडी

सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंटेनरची कारला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या भागात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरनं समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. एमएच २४ एए ८०५५ असा या कारचा क्रमांक आहे. ही धडक इतकी भीषण होती, की त्याच्या आघातामुळे कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात शिरली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला.

दरम्यान, या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण ही व्यक्ती नेमकी कंटेनरमधील आहे की कारमधील, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago