गुन्हे विश्व

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये ही घटना घडली आहे. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा प्रकार  घडला आहे.

सराईत गुन्हेगाराकडून नागरिकांना त्रास

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा येथील सराईत गुन्हेगार शक्‍ती सिंह  हा परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांनी त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार मिळताच पोलीस त्याला पकडण्यासाठी गुरुवारी रात्री कोतेवस्ती परिसरात आले.

मात्र आरोपी शक्ती सिंह याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने अचानक हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने पोलीस देखील गोंधळून गेले. पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. जमावाच्या हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

…म्हणून झाला पोलिसांवर हल्ला

पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याची माहिती शक्‍ती सिंह याला आधीच होती. त्याने आपल्या समाजातील नागरिकांना पोलिसांविरोधात भडकावले. सिंह याचे ऐकून स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये काही पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला व पोलिसांनी अखेर आरोपी शक्‍ती सिंह याला अटक केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago