पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात एका गावात सात वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
सदर मुलीचा मृतदेह काल रात्री गावाशेजारीच असणाऱ्या डोंगरातील दरीत आढळून आला. अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी गावातीलच संतोष चंद्रु थोरात या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
अत्याचार करून हत्या करण्यात आलेली सात वर्षीय मुलगी दुसरीच्या वर्गात शिकते. ती काल दुपारी साडेतीनच्या सुमारास बाहेर खेळायला गेली, मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेऊन घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली.
मात्र ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळवण्यात आले. खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज दोसाई यांच्या मतदारसंघांत ही घटना घडल्याने पाटण पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत आरोपीला गजाआड केलं आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत रात्रभर कसून तपास केला. एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता पहाटे त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…