तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्याने तिसरीही मुलगीच झाली म्हणून नवजात बाऴाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या मदुराई जिल्हयात ही घटना घडली असून या प्रकरणातील आई वडिल हे त्यांच्या दोन मुलींसह फरार झाले आहेत.
या दाम्पत्याने मुलीला जिवंत जमिनीत पुरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ओ मुथूपांडी याची पत्नी असलेल्या कौसल्या हिने 21 डिसेंबर रोजी सेडापत्ती प्राथमिका आरोग्य केंद्रात एका सुदृढ बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती ठणठणीत होती. सहा दिवसानंतर 26 डिसेंबर रोजी गावातील एक परिचारिका आई आणि बाळाची तपासणी करायला आली त्यावेळी कौसल्या हिने बाळ दगावल्याचे तसेच घरासमोर त्याचे अंत्यसंस्कारही केल्याचे त्यांनी त्या परिचारिकेला सांगितले. ते ऐकून तिला धक्काच बसला. परिचारिकेला हा संशयास्पद मृत्यू असल्याची शक्यता वाटल्याने तिने या घटनेची पोलिसात खबर दिली. परिचारिकेने पोलिसांना कळविल्यानंतर मुथूपांडी व कौसल्या घाबरले व त्यांनी त्यांच्या दोन मुलींना घेऊन गावातून पळ काढला.
दरम्यान आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बाळाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी बाळाचा पुरलेला मृतदेह देखील बाहेर काढला जाऊ शकतो. याप्रकरणी पोलिसांनी पालकांविरोधात कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…