पंढरपूर नगर पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ आज रात्री १२ वाजता समाप्त होणार असून त्यानंतर नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू होणार.मात्र आज मुदतपूर्तीच्या अंतिम दिवस असतानाही स्थायी समितीने आपली ‘जबाबदारी’ पार पाडली असून २४ डिसेंबर रोजी काढलेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यानुसार आज नगर पालिकेत स्थायी समितीची बैठक पार पडली.
आजच्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर १) मागील सभेचा इतिवृत्तांत मंजूर करणे २) नगर पालिकेच्या विविध विभागाकडून विविध कामांसाठी आलेल्या वार्षिक निविदा व इ टेंडर विभाग प्रमुखांनी केलेल्या शिफारशी नुसार मंजूर करणे.३) मा.अध्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या मंजुरी आदेशास कार्योत्तर मंजुरी देणे.४) मा.सभापती यांच्या मंजुरीने आयत्या वेळच्या ५ विषयांना मंजुरी देणे आदी विषय स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
या बाबत मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता लेखा परीक्षक नेमुणकीच्या ठरावास मंजुरी देण्यासाठी हि बैठक बोलविण्यात आली होती अशी माहिती दिली.मात्र याच वेळी वार्षिक निविदा व इ टेंडर विभाग,आयत्या वेळचे ५ विषय कुठले होते याची माहिती विचारली असता इतर कुठला ठराव नव्हता असे त्यांनी सांगितले आहे. स्थायी समितीच्या या बैठकीस सत्ताधारी आघाडीचेच एक जेष्ठ सदस्य अनुपस्थित होते अशी चर्चा असून इतर काही सदस्यांकडून सुत्रांकरवी ‘सखोल’ माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही. आजच्या बैठकीत अजेंड्यावरील कोणते विषय मंजूर झाले याची सविस्तर माहिती पंढरी वार्ताकडून घेतली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…