सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिरासाहेब रुपनर यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय अदाटे यांच्या हस्ते स्व. बिरासाहेब रुपनर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या उत्तुंग कार्याविषयीची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.यावेळी बोलताना प्राचार्य शरद पवार म्हणाले कि, स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांना अल्प आयुष्य लाभले परंतु त्यांचे संपूर्ण कार्य हे विशाल, समाजउपयोगी व प्रेरणादायी असे होते. असेच कार्य करण्याची प्रेरणा आपण त्यांच्या कडून घेतली पाहिजे. अशा या महान असामान्य कर्तृत्वास विनम्र अभिवादन.
या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,अकॅडमिक डीन टी एन जगताप, फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील सर्व शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…