सासरा करत होता सुनेला ब्लॅकमेल,अंघोळ करताना गुपचूप काढला होता व्हडिओ

 

पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सदर गुन्ह्यातील पिडीता राहणेस असुन मागील दोन आठवड्यापुर्वी दुपारी 12/30 वा.चे सुमारास पिडीता हि एकटी घरी असताना पिडीताचे सासरे यांनी पिडीता हिचे अंगावर हात टाकुन तिचेशी बऴजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेऴी पिडीता हि जोरात ओरडल्यानंतर तिला त्यांनी सोडुन दिले होते.

घडलेला सदर प्रकार हा पिडीता हीने त्याचे पती यांना सांगीतला होता पंरतु त्यावेऴी पिडीतेची समजुत घातली होती.

दिनांक 20/12/2021 रोजी सकाळी 08/00 वा.चे सुमारास पिडीता हि घराचे समोर असलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना पिडीतचे सासरे याने पिडीतीचे न कळत त्यांचे मोबाईलमध्ये शुटींग काढले व सदरची शुटीग हि पिडीतेस दाखवुन तिस तुला माझे मुलापासुन मुलबाळ होणार नाही तु माझेशी संबंध ठेव तुला मुलबाळ होईल. तु संबंध नाही ठेवले तर मी तुझे आंघोळ करतानाचे शुटींग पुढे पाठविण असे म्हणुन ब्लॅकमेल केले.

त्यावेळी पिडीता हिने फोन करण्याचे कारणाने तिचे सासरेचा मोबाईल घेतला व सासऱ्याची नजर चुकवुन तो पिडीता हिने पाहुन खात्री करुन तो पिडीतेचा भाऊ याचे मोबाईलवर पाठवला होती. त्यानंतरही पिडीता हिचे सासरे यांनी पिडीता हिची अंघोळ करतानाची शुटींग पिडीता हिस वांरवार दाखवुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असलेने पिडीता हि माहेरी मंगळवेढा येथे जावुन तीचे आईवडीलांना सदरचा प्रकार सांगुन आज रोजी पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणेस तक्रार दिल्याने पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 434/2021 भा.द.वि कलम 354, 354अ (दोन), 354(क), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी सासरा यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढऱपुर विभाग पंढऱपुर व पोनि धनंजय अ. जाधव, पोलीस निरीक्षक पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आप्पा कर्चे हे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago