कर्वेनगरमधील चितळे दुकानाजवळ एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अनिल राजेंद्र जाधव (वय २०, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.
अनिल जाधव हा याला दोन बहिणी असून एक कर्वेनगर येथे राहते, तर दुसरी डहाणूकर कॉलनी परिसरात राहते. अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. तो त्याच्या बहिणीला लक्ष्मीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला होता. बहिणीला सोडून जात असताना ताथवडे उद्यान परिसरातील देवेश चितळे दुकानाजवळ दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी अनिल याला अडवलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले.
या हल्ल्यात अनिल हा गंभीर जखमी झाला. हल्ला झालेला परिसर हा उच्चभ्रू असून या ठिकाणी वर्दळ असते. अनिल हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अलंकार व गुन्हे शाखेचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात अनिल याचा मृत्यू झाला असून घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती.
दरम्यान, अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. त्याच्या अगोदरच त्याचा खून झाल्याने जाधव कुटुंब हादरून गेलं आहे. या तरुणाच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…