राजस्थान ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीत घट झाली आहे.
राज्यात 28 ते 30 डिसेंबर या काळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. याची तीन कारणे आहेत. दक्षिण-पश्चिम राजस्थान ते विदर्भ भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून थेट विदर्भात पाऊस
येण्याची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा होणार असल्याचा अंदाज आहे.
पूर्व अफगाणिस्तान व पाकिस्तानात पश्चिम भागात चक्रवात सक्रिय झाला आहे. तसेच राजस्थान व बिहारमध्ये वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशातील 26 राज्यांत आगामी तीन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात दाट धुक्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…