ताज्याघडामोडी

एसटी कर्मचारी संपाचं करायचं काय?; शेवटी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

अनेक प्रकारे कारवाया करून देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. एककीडे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असून दुसरीकडे सर्वसामान्य जनताही भरडली जात आहे.

हे लक्षात घेत आणि पुन्हा एकदा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई आता अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका परिवनहन मंत्री परब यांनी घेतली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आमच्यावर ज्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, तशीच ती सर्वसामान्य जनतेचंही आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी संप आणखी ताणून धरू नये.

त्यांनी कामावर परत यावे. दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान होणार आहे. यात कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असे परब यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगार वाढ देण्यात आली असून आता त्यांनी अधिक ताणून धरू नये. एका शब्दावर अडून बसू नये. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागणार आहे. जनतेलाही उत्तर द्यायचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडते, त्यामुळे लवकर कामावर रुजू व्हा, असे कळकळीचे आवाहन परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago