ठाण्यातील कळवा परिसरात शनिवारी बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह एका पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस तपासात वेगळीच आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
कळवा परिसरात सायबानगरमध्ये राहणारे पाच महिन्यांचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता झालेले बाळ घरापासून काही अंतरावर एका गल्लीतील घरासमोरील पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये मृतावस्थेत आढळले होते.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या बाळाची तब्येत ठीक नव्हती. खोकला आणि उलट्या होत असल्याने त्याच्या आईने त्याला औषध दिले. परंतु, ते अधिक प्रमाणात दिल्याने बाळ मरण पावले, असा समज तिचा झाला. तिने बाळाला लपवून ठेवले. त्यानंतर सकाळी बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकले, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बाळाच्या आईला अटक केली आहे.
आदल्या दिवशी काय घडलं होतं नेमकं?
कळवा परिसरात सायबानगरमध्ये पाच महिन्यांचे बाळ शुक्रवारी अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणात कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. कळवा पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरू केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना, शनिवारी सकाळी या मुलाचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीतील एका घराबाहेरील पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला होता.
नेमका मुलाचा मृत्यू कसा झाला?, ही हत्या आहे की आणखीन काही प्रकार? याविषयी कळवा पोलीस कसून चौकशी करत होते. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली जात होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…