ताज्याघडामोडी

माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपये लंपास

माजी आमदाराच्या ड्रायव्हरकडून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीचा माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

पीडित करण याने सांगितले की, तो छजपूर येथील निवासी आहे. रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या गावाला जात होता. त्यावेळी धान्य गोदामाच्या जवळ येताच नंबर नसलेल्या बाईकवर आलेल्या तरुणांनी त्याच्या अंगावर मिरची पूड टाकली. यावेळी करण याच्या डोळ्यातही मिरची पूड गेली. त्यावेळी चोरट्यांनी करणच्या जवळील 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

यावेळी करण याने चोरट्यांना विरोध केला तसेच पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी पुन्हा करणच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्याला ढकलून दिले. यावेळी करण खाली जमिनीवर कोसळला.

पीडित करण याने सांगितले की, या घटनेवेळी तेथे दुसरी बाईक आली आणि त्यावर तिघेजण बसले होते. एकूण पाच जणांनी मला पकडले आणि मारहाण केली. आरोपींनी माझ्या जवळील मोबाइल फोनही हिसकावला मात्र, तो तेथेच टाकून आरोपींनी पळ काढला. करणने सांगितले की, हे पैसे त्याने आपल्या एका मित्राकडून उधार घेतले होते.

सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी एसएचओ अतार सिंह यांनी सांगितले की, छाजपूर खुर्द येथे राहणारा करण आपल्या घरी जात होता. त्यावेळी दोन बाईक्सवर आलेल्या आरोपींनी त्याला रोखले आणि त्याच्याकडील 1 लाख 17 हजारांची रोकड लुटली. आरोपींनी करणच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago