ताज्याघडामोडी

LPG Cylinder मुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई

LPG गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सुचना वारंवार दिल्या जातात. कारण, सिलेंडरमधील छोटासा बिघाड देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो.

एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे, हे जाणून तर घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की, जर एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत.

50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट होऊन अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.

या इन्शुरन्ससाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी असते. डिलिव्हरीपूर्वी सिलेंडर व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी डीलरची असते. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची असते. अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचं आणि घराचे नुकसान झाल्यास, 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम करता येतो.

अपघातानंतर इन्शुरन्स क्लेम करण्याची प्रक्रिया मायएलपीजी.इन (http://mylpg.in) या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे. वेबसाइटनुसार, ग्राहकाला मिळालेल्या एलपीजी कनेक्शनच्या सिलिंडरमुळं घरात एखादी दुर्घटना घडली, तर ती व्यक्ती 50 लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी पात्र ठरते. 1. गॅसमुळे अपघात झाल्यास जास्तीत जास्त 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago