जगभरात वेगाने पसरत चाललेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसरी लाट आली तर ती ओयामक्रॉनमुळेच असेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
या चिंतेच्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं आहे की अॅस्ट्राझेनेका लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये ओमायक्रॉनविरूद्ध लढा देणाऱ्या अँटीबॉडी वेगाने वाढत आहेत. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास बूस्टर डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता ही अत्यल्प आहे.
हिंदुस्थानसाठी ही बातमी विशेषार्थाने आनंदाची आहे, कारण आपल्या देशात 90 टक्के लोकांना अॅस्ट्राझेनेकाचीत लस देण्यात आली आहे. अॅस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टीट्यूटने बनविलेल्या लसीचे नाव आहे कोविशील्ड असं आहे. अॅस्ट्राझेनेकाने गुरुवारी जाहीर केलं आहे की बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनपासून तगडं संरक्षण कवच मिळतंय.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अॅस्ट्राझेनेकाचा बूस्टर डोस घेतलेल्या 41 जणांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची तुलना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांशी करण्यात आली. या तुलनेतून असं दिसून आलं की कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोविशील्डचा तिसरा डोस घेतलेल्यांच्या शरीरात ओमायक्रॉनविरोधी अँटीबॉडींचे प्रमाण हे खूप जास्त होतं.
या निष्कर्षानंतर संशोधकांनी आवाहन केलं आहे की बूस्टर डोस देणं गरजेचं आहे. हिंदुस्थानात अद्याप बूस्टर डोस देण्याची सुरूवात झालेली नाहीये. 80 देशांमध्ये बूस्टर डोस देण्याची सुरुवात झाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…