गुन्हेगारी पार्श्वभूमीवर उमेदवार देताना यापुढे आता मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरणाला धक्का देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. नव्या नियमावलीनुसार आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्यामागची कारण द्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जनतेला समजली पाहिजे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवाराचं क्राइम रेकॉर्ड जनतेसमोर ठेवावे लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार न दिल्यास राजकीय पक्षांची मोठी कोंडी होणार आहे. हा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला मोठा दणका आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे की, एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर थेट जनतेसमोर त्याचे कारण द्यावे लागेल. हाच उमेदवार का निवडला, हे जनतेला सांगावे लागेल. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्याबाबत मतदारांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी अर्थातच संबंधित राजकीय पक्षाची राहणार आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…