उत्तरेकडील राज्यात शीत लहर आली असून तेथील थंड वारे हे दक्षिणेकडे येऊ लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. ते सरासरीच्या तुलनेत ५.६ अंशाने घटले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणचे किमान तापमान सिंगल डिजिट झाले असून कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश या उत्तर भारतातील अनेक राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. राजस्थानमधील अनेक ठिकाणचे तापमान शुन्याच्या खाली गेले आहे. जम्मू काश्मीर, लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे.
उत्तरेकडील थंड वार्यांचा जोर वाढला असून ते आता दक्षिणेकडे येत आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. पुणे शहरातील तापमान उद्या १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात ते ८ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…