इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाऊंट होल्डर्सला एका मर्यादेनंतर कॅश काढणे आणि डिपॉझिट करण्यावर चार्ज द्यावा लागेल.
हा नियम 1 जोनवारीपासून लागू होईल. IPPB मध्ये तीन प्रकारचे सेव्हिंग अकाऊंट उघडता येऊ शकतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दरमहिना चारवेळा पैसे काढणे मोफत आहे. परंतु यानंतर प्रत्येक विद्ड्रॉलवर किमान 25 रुपये द्यावे लागतील. मात्र, बेसिक सेव्हिंग खात्यात पैसे जमा करण्यास कोणतेही शुल्क नाही.
सेव्हिंग्ज अकाऊंट आणि करंट अकाऊंट
बेसिक सेव्हिंग अकाऊंटशिवाय सेव्हिंग आणि करंट अकाऊंटमध्ये महिन्यात 10,000 रुपये जमा केल्यास कोणताही चार्ज नाही. परंतु या मर्यादेपेक्षा जास्त जमा केल्यास किमान 25 रुपये चार्ज लागेल.
बेसिक सेव्हिंग अकाऊंटशिवाय अन्य सेव्हिंग अकाऊंट आणि करंट अकाऊंटमूधन दर महिना 25,000 रुपये काढल्यास कोणताही चार्ज लागणार नाही.
मात्र, फ्री लिमिटच्या नंतर प्रत्येक वेळी पैसे काढण्यावर किमान 25 रुपये चार्ज द्यावा लागेल. IPPB च्या वेबसाइटनुसार, हे सर्व नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.GST/CESS वेगळा लावला जाईल.यापूर्वी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 1 ऑगस्ट 2021 डोअरस्टेप बँकिंग चार्ज चे नवीन दर लागू केले होते.यासाठी ग्राहकांना 20 रुपयांचा चार्ज ठरवण्यात आला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…