उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. लग्नाची वरात काही वेळातच मंडपात येणार होती. पण वरात येण्यापूर्वीच नवरीने पळ काढला. वरात येण्यापूर्वी नवरीने आपल्या घरातील सदस्यांच्या चहात गुंगीचे औषध टाकून तो पाजला आणि घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. चहा पिऊन बेशुद्ध झालेल्या काही जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
तरुणीचे शेजारच्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे ती लग्ना होण्याच्या आधी पळून गेल्याचं सागंण्यात येतंय. त्यांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. मुलीचे कुटुंबीय लग्नात अडसर ठरले होते. त्यांनी मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले आणि लग्नाची वरात काही वेळात येणारच होती. मुलगी रात्रीपर्यंत खूप आनंदी दिसत होती.
या आनंदाच्या भरात तिने कुणाकुणाला चहा प्यायचा आहे, असे विचारले. घरी जवळपास सगळ्यांनीच चहा प्यायला होकार दिला. मात्र, चहामध्ये गुंगीचे औषध मिसळल्याचे कोणालाच माहीत नव्हते.
चहा प्यायल्यानंतर सर्व बेशुद्ध झाले. यानंतर घरात ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन नवरी मुलगी प्रियकरासह पळून गेली. नवरी मुलगी पळाल्याने लग्नाचा मंडप आणि भोजनाची तयारी मैदानातच पडून होती.
ज्या मुलीवर विश्वास ठेवला तीच मुलगी ‘चुना’ लावून गेली, असं इतकं घरच्यांना वाईट वाटलं. दुसरीकडे नवरदेवाची आली. अखेर कुटुंबीयांनी फरार मुलीच्या लहान बहिणीशी त्याचे लग्न लावून देण्याचे मान्य केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…