ताज्याघडामोडी

सभापतीचा नवराच वाळूचोर निघाला, ऐन निवडणुकीत झालेल्या कारवाईने भाजप अडचणीत

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिंपरी भाजपा अडचणीत आलं आहे. रेती तस्करी करीत असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सापडला. महसूल विभागाने केलेल्या कारवाईने भाजपच्या गोटात सन्नाटा पसरलाय.

गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरुमाची चोरी सुरु असताना महसूल विभागानेआज पानोरा व राळापेठ नदीपात्रातून रेतीची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

यातील एक ट्रॅक्टर गोंडपिंपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या सभापतीचे पती रेती तस्कर निघाल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरुन प्रचारात रान उठवल्याने भाजप तोंडघशी पडलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago