ताज्याघडामोडी

मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ.

मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा चक्रावून जातात. अशीच चक्रावुन सोडणारी घटना उल्हासनगर या ठिकाणी घडली आहे.

एका खरात काम करणाऱ्या मोलकरणीने चक्केक नाही दोन नाही तर तब्बल 91 तोळे सोन्याचे दागिने चोरले आहेत. तिची हि चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून तिला पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथे घडलेल्या चोरीच्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनांप्रमाणे इतरही ठिकडायचे हे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी अनेकवेळा चोरट्याला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, प्रत्येकवेळी संबंधित चोरी करणारी महिला हि पोलिसांना चकवा देत होते. अखेर तिची चोरी सिसिटीव्हीत कैद झाली.

क्राइम ब्रांचने महिला अटक केली असून तिच्याकडून 25 तोळे सोने हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिली. संबंधित फरार झालेल्या आरोपींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम तनवाणी हे राहतात. त्यांच्याकडे घरकाम करण्याच्या बहाण्याने एक महिला आली होती. तीन-चार दिवसांपूर्वीच ती घरकाम करण्यासाठी आली होती. घरातल्यांच्या नकळतपणे तिने चावी सोबत नेली होती. तक्रारदार आणि त्यांचे कुटुंब बाहेर गेले होते. त्यावेळी या महिलेने घराचा दरवाजा आपल्याकडील चावीने उघडले आणि प्रवेश केला.

घरातील 91 तोळे सोने चोरून पोबारा केला होता. तनवाणी कुटुंब घरी परतल्यानंतर ही धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago