कॅपजेमिनी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती खरमाटे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की कॅपजेमिनी या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील ज्योती खरमाटे या विद्यार्थिनी ची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक सर्वोत्तम ७.१ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. कॅपजेमिनी कंपनी ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील नामवंत कंपनी आहेत. दर वर्षी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये विविध बहुराष्ट्रीय कंपन्या येत असतात व पात्र विद्यार्थ्यांची निवड करतात.
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून च कर्मयोगी पॅटर्न द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्याचे महत्वाचे काम केले जाते तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षा पासून दिले जाते त्यामुळे कर्मयोगी चे अनेक विद्यार्थ्यांची आज विविध नामांकित कंपनी मध्ये निवड होत असताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात राहून कर्मयोगी महाविद्यालयातून अनेक सर्वोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होत असलेमुळे विद्यार्थी व पालक वर्गामद्धे आनंदाचे वातावरण आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. एस एम कुलकर्णी तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी ज्योती खरमाटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…