शिखर शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फूट खोल दरीत मोटार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील माय-लेकाचा मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी अपघातात मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावे आहेत.
नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी थदाळे या आपल्या मूळ गावी आले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघे मोटारीने नाशिककडे जात होते.
शिखर शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फूट खोल दरीत त्यांची मोटार कोसळली. या अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. शिखर शिंगणापूर येथील ट्रेकर्स ग्रुप व युवकांनी 400 फूट खोल दरीतून मानवी साखळी करून मृतदेह वर काढले.
यामध्ये ‘शंभू महादेव प्रतिष्ठान’चे वीरभद्र कावडे, शिंगणापूरचे माजी उपसरपंच शंकर तांबवे, मिथुन कर्चे, अक्षय शेंडे, अनिल करचे, अमोल राऊत, आनंद बडवे गुरुजी, विकास मदने यांच्यासह माळशिरस तालुक्यातील करचेपिंप्री गावातील तरुणांचा सहभाग होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…