गुन्हे विश्व

जावयाचा खून करून सासऱ्याने केली आत्महत्या

मुलीला मारहाण का करतोस, का त्रास देतोस असे म्हणून सासऱ्याने जावयाचा खून केला. त्यानंतर स्वतः लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन रेणापूर नाका भागामध्ये साईधन लॉजवर खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर उमेश रमेशराव देशमुख (वय 37) रा.कातपूर याचा मृतदेह पोलीसांना आढळून आला तर मयताचा चुलत सासरा शिवाजी दगडू शिंदे (वय 49) याचाही मृतदेह आढळून आला. मयत उमेश रमेशराव देशमुख हा शिवाजी शिंदे चालवत असलेल्या साईधन लॉजवर आला.

तो आल्यानंतर त्यांनी दारू पिली. मुलीला मारहाण करतो, का त्रास देतो यावरुन दोघात बाचाबाची झाली आणि शिवाजी शिंदे यांनी उमेश देशमुख याचा खून केला. दरम्यान स्वतः त्यांनी लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago