ताज्याघडामोडी

वेळेवर आली नाही म्हणून मोलकरणीला सँडलने मारले; अभिनेत्रीला अटक

अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे.

मोलकरणीला कामावर येण्यास उशीर झाल्यामुळे अभिनेत्रीने अल्पवयीन मोलकरणीला सँडलने मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशीरा कामावर येऊन वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने या अल्पवयीन मुलीवर हल्ला केला. ही संशयित आरोपी अभिनेत्री मुंबईतील वर्सोवा परिसरात राहते, त्यामुळे वर्सोवा पोलिसांनी तिला अटक केली आहे.

विशेष म्हणजे ही अभिनेत्री तिच्या वर्सोवा फ्लॅटमध्ये एकटीच राहते, परंतु तिने पीडित मुलीवर अनेकदा अत्याचार केले आहेत. नीट काम करत नसल्याचे सांगत तिला अभिनेत्रीने मारहाण केली आहे. पीडितेने आतापर्यंत कधीही याबद्दल तक्रार केली नव्हती, परंतु यावेळी अभिनेत्रीने तिला मारहाण केली तसेच फोटो व व्हिडिओसाठी तिचे कपडे काढण्यास सांगितले.

दरम्यान, पीडितेचे म्हणणे आहे की, तिला आरोपी अभिनेत्रीने सँडलने मारहाण केली, तर तिच्या कपाळावरही जखम झाली आहे. त्यामुळे पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पीडितेची जखम पाहून तिच्या बहिणीने तिला विचारले, त्यानंतर अल्पवयीन मुलीने सर्व काही सांगितले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या संदर्भात असेही सांगण्यात येत आहे की, अभिनेत्रीला माहीत होते की, ती ज्या मुलीला घरकामासाठी ठेवत आहे ती अल्पवयीन आहे, त्यानंतरही तिला काम करायला लावले होते. आता अभिनेत्रीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago