साखर कारखान्याच्या ठेकेदाराची गाडी अडवून मारहाण,रोख रक्कम पळवली

पंढपुर तालुक्यातील कोर्टी हद्दीत दिनांक 12/12/2021रोजी फिर्यादी अनिलकुमार निवृत्ती बोरूडे,मनोजकुमार रामकैलास गिरी,ब्रीजेश चौरासिया हे तीन इसम दुपारी तीन वाजनेच्या सुमारास आपल्या चारचाकी फोर्ड फिगो या कार मधून कोर्टी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर गावचे हद्दीत रात्रौ8/30वा.चे सुमारस आले असता पाठीमागून एक लाल रंगाची चारचाकी इंडीका व्हिष्टा गाडी जोरात येऊन आमचे गाडीस गाडी आडवी लावून आम्हाला थांबवून तुम्ही आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणून सदर करारमधून चार इसम खाली उतरले उतरत फिर्यादीच्या कारजवळ आले व ड्रायंव्हर मनोजकुमार गिरी याला दरवाजा उघडू मारहाण केली.
त्यानंतर पाठीमागे बसलेले चौरासिया यास हाताने लाथाबुक्याने जोरात मारहाण करीत त्याचे जवळील पैशाचे पाकीट व महत्वाची कागदपत्रे असे काढून घेतले.त्यानंतर फिर्यादी अनिलकुमार निवृत्ती बोरूडे याना मारहाण करीत पैसे मागू लागले त्यावेळी फिर्यादीने त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला पैसे हवे असतील मी एटीएम मधून काढून देतो असे म्हणताच त्यांचे गाडीमध्ये बसवून कोर्टी गावात आणून तिथे एका माणसाला बोलावून घेऊन त्यास अकाऊंट नंबर विचारून घेतला व त्या अकाऊंटवर फिर्यादीचे मोबाईल फोनमधील फोनपे वरून 5500/-रू. टाकणेस सांगितले सांगितले असल्याचे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी अनिलकुमार निवृत्ती बोरूडे रा.यशवंत काँलनी चंद्रमा दरेवाडी अहमदनगर हे व्यवसायाने इरेक्शन काँटँक्टर असून सदाशिव नगर येथील साखर कारखान्याचे काम संपल्याने खर्डी येथील कामासाठी ते निघाले होते असे सांगण्यात आले आहे.या प्रकरणी पंढपूरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ४ अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago