पंढरपूर दि. (12):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 394 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण 5 कोटी 99 लाख 10 हजार 133 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.
जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत 14 हजार 882 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 138 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच 4 हजार 624 दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 256 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशी एकूण 394 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीसाठी एकूण 6 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधिश श्रीमती के.व्ही. बोरा, न्यायाधिश एम.आर.जाधव, न्यायाधिश एस.एच.इनामदार, न्यायाधिश श्रीमती एस.एस.खरोशे, न्यायाधिश श्रीमती ए.एस.नलगे, न्यायाधिश एम.आर. कामत तर विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधिश एम.बी लंबे यांनी काम पाहिले.
या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , वित्तीय संस्था, महावितरण यांची दाखल पुर्व प्रकरणे, पंचायत समिती घरकूल प्रकरणे तसेच पंढरपूर नगरपरिषदेची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
यावेळी विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…