क्रिकेट स्पर्धा सुरू असताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हल्ली टेनिस क्रिकेटचे अनेक सामने सोशल माध्यमांवर थेट प्रसारीत होत असल्याने या सामन्यांचे महत्व आणि प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे सामने सुरू असताना अनेक धक्कादायक प्रकार देखील घडल्याची उदाहरणे आहेत. असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात साई सिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू असून गुरुवारी ९ डिसेंबर रोजी क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजी करून पवेलीयनमध्ये परतलेल्या खेळाडूला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सहकारी खेळाडूंनी प्रथम जवळच्या खाजगी रुग्णालयात व नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. लोकेश अर्जुन ढोबळे (वय २७, राहाणार गजानन नगर, कोपरगाव) असे मृत झालेल्या युवा खेळाडूचे नाव आहे.
लोकेशच्या मृत्युची बातमी कळताच मोठ्या संख्येने तरुण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पोहचून पंचनामा केलाय. लोकेश हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…