शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा भावाची दादागरी पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केलं म्हणत भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजू भुमरे यांचा मारहाण करतानाचा फोटो सुद्धा समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुमरे यांच्या मतदारसंघातील धुळे-सोलापूर महामार्गापासून ते साजेगाव ते लिंबगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तर याच बोगस रस्त्याबाबत भाजप तालुका उपाध्यक्ष रणजीत नरवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत होते.
याबाबत माहिती मिळताच राजू भुमरे आपल्यासोबत काही लोकांना हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. फेसबुक लाईव्ह संपताच भुमरे यांनी नरवडे यांना शिवीगाळ करत हातातील दांड्याने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे नरवडे यांच्या पाठीवर ओळ उमटेपर्यंत मारहाण करण्याचा आल्याचा आरोप नरवडे यांनी केला आहे. तर याप्रकरणी पाचोड पोलिस तक्रार सुद्धा घेत नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.
तालुक्यात रस्ते न करता कोट्यवधींचे बोगस बिल काढल्याची तक्रार बद्रीनारायण भुमरे यांनी विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांनतर माध्यमात बातम्या येताच अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनतर या कामांची सुरवात झाली आणि त्याचा कामाबाबतच नरवडे फेसबुक लाईव्ह करत होते. ज्यामुळे राजू भुमरे खवळले आणि त्यानीं नरवडे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…