फॅबटेकच्या विराज गावडे या विद्यार्थ्यांची टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित कंपनी मध्ये निवड

 येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनिअरिंग  विभागातील विराज गावडेची या  विद्यार्थ्यांची  टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना  वार्षिक ३.३६ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
टीसीएस  हि अंतरराष्ट्रीय  आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे.कॅपजेमिनी  हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस येथे आहे. शिवाय या कंपनीचा ५० पेक्षा जास्त देशात विस्तार असून  हि कंपनी सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते.अशी माहिती  सीव्हिल इंजिनिअरिंगचे  विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे यांनी सांगितले.

     या निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी  अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर,  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अभिमान  कणसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर, सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago