ताज्याघडामोडी

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक. *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक.

*पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने

*पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय, भाजप किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन दिपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनादरम्यान पुनर्वसन विभागाच्या तात्कालीन अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आरपीआय,भाजपा किसान मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

सोलापूर पुनर्वसन विभागात प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात  साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे तत्कालीन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात होती.
 सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा शोध घेऊन सदर व्यवहारात मिलीभगत करून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहारही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांच्या एकाच आदेशावर दोन-दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला आहे. आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आरपीआयचे दिपक चंदनशिवे यांनी केली होती.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना  प्रकरणनिहाय सखोल चौकशी करून १५ दिवसात स्पष्ट अहवाल सादर करावा असे आदेश २८ सप्टेंबर २०२१ रोजी दिला होता. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी आरपीआय, भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसीलसमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने लोक कलावंत तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.
या आंदोलनात महिलांची संख्या लक्षवेधी ठरली.
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी सुरेश नवले, नितीन काळे, संतोष ननवरे, विजयकुमार खरे, दत्ता वाघमारे,पिंटू कांबळे, भास्कर चंदनशिवे, अनिल चंदनशिवे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, परशुराम शिंदे, महादेव सोनवणे, सय्यद पठाण, सौ.अविंदा गायकवाड, रवी भोसले, अनिल काळे, नाथा बाबर, सुजित सोनवणे, परसू शिंदे, संजय भोसले, शाहू शिंदे, कलीम पठाण आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago