कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेचे वातावरण आहे. देशात आतापर्यंत पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान आता जोधपूर येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस ओमायक्रॉन व्हेरिएंटचं ठेवलं. त्याने हे ठेवलेलं स्टेटस महागात पडलं आहे.
…म्हणून पोलिसांनी केली कारवाई
ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बासनी पोलिसांनी त्याच्या विरोधात संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सुनील असे असून तो जोधूपर एम्स रुग्णालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो.
सुनील एम्स रुग्णालयात कार्यरत आहे. त्यामुळे त्याने ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस अनेकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. तसेच प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कोरोना कंट्रोल रूममधील फोन खणखणू लागले. नागरिकांकडून या संदर्भात विचारणा होऊ लागली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…