पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह पाचजणांवर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद म्हाळाजी खरात (34, रा. रुईगव्हाण, ता. कर्जत) असे मृताचे नाव असून, पत्नी राणी शरद खरात (27, रा. चिंचोली काळदात), पतिंग मारुत जामदार, लाला विश्वनाथ खराडे, आशाबी मोहसीन शेख, गोपाळ रामदास हराळ (सर्व रा. देऊळगाव, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राणी हिला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सुभाष खरात याने फिर्याद दिली आहे.
शरद खरात याच्या पत्नीचे देऊळगाव येथील गोपाळ हराळ याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती. पतीच्या परस्पर राणी आणि तिचा प्रियकर श्रीगोंदा शहरात भाड्याने खोली घेऊन पती-पत्नी असल्याचे सांगून राहत होते. याबाबत शरदने तिच्या माहेरच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी तिला घरी परत आणून यापुढे असे करू नको, असे सांगितले.
तरीही घटस्फोट घेण्यासाठी 10 लाख रुपये दे, असे म्हणत साथीदारांच्या मदतीने ती शरदला मारहाण करीत असे. याला कंटाळून शरदने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…