पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने नुकताच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा बरोबर सामंजस्य करार झाला असून विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन ३६ तासांचे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून अभियांत्रिकीच्या शिक्षण क्षेत्रात सिंहगड इन्स्टिट्युट दबदबा वाढत असुन या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या खुप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार प्लेसमेंट मिळावे यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार दि.२९ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक ४ डिसेंबर २०२१ या कालावधीत दररोज ६ तास याप्रमाणेच महाविद्यालयात ३६ तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
कंपनीत नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठीमहाविद्यालयाचा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा सोबत नुकताच सामंजस्य करण्यात आला आहे.
यामध्ये इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळणार असुन, बायोडाटा, मुलाखतीची तयारी इंग्लिश मधून कशी करावी इत्यादी गोष्टी या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना समुह चर्चा, व्यक्तिमत्व विकास, विविध उपक्रम केंद्रीत प्रशिक्षण, मुलाखतीला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले वक्तृत्व या विषयीचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या निवडीबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. मेघा गोरे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…