ताज्याघडामोडी

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने केले विष प्राशन

कामाचा अतिरीक्त ताण असह्य झाल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याने २३ नोव्हेंबर रोजी एरंडोल येथे विष प्राशन केलं होतं.

उपचार सुरू असताना आज शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. संजय नामदेव पाटील (वय ५२, रा. चाळीसगाव) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. विष घेण्यापूर्वी त्यांनी भूमी अभिलेख अधीक्षकांकडे आत्महत्येस परवानगी द्या, असा अर्ज केला होता.

मृत संजय पाटील यांचा मुलगा प्रशांत याने याबाबत आज माहिती दिली. त्यानुसार, वडील एरंडोल येथील भूमापक कार्यालयात निमतानदार पदावर काम करत होते. सन २०१९ पासून वरिष्ठ अधिकारी कामाचा अतिरिक्त दबाव टाकत असल्याने संजय पाटील तणावात काम करायचे. मोजणीचे काम त्यांचे नव्हते. त्यांना कार्यालयात डेटा एण्ट्रीचे काम देणं अपेक्षित होतं.

मात्र, त्यांच्याकडून मोजणीचे काम देखील करुन घेतले जात होते. डेटा एण्ट्रीच्या कामाचाही ताण होता. याबाबत त्यांनी कुटुंबाना देखील कल्पना दिली होती. त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी कार्यालयातच विष प्राशन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने पाटील यांची चौकशी केली नाही, असा आरोपही मृत पाटील यांच्या मुलाने केला आहे. वडिलांच्या मृत्यूस जबाबदार चारही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी प्रशांत व त्याचे मामा शांताराम पाटील यांनी केली आहे.

कुटुंबियांचा आक्रोश

पाटील यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने मोठा आक्रोश केला. संबधितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला होता. मृत पाटील यांच्या पश्चात मुलगा पत्नी रजनी, मुलगा प्रशांत, मुली अश्विनी व प्रियंका असा परिवार आहे. पाटील हे चाळीसगाव शहरात राहत होते. ते दररोज चाळीसगाव येथून एरंडोलला कामासाठी जात.

अर्ज लिहून दिली होती माहिती

संय पाटील यांनी आत्महत्या करण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज केला होता. त्या अर्जात म्हटल्याप्रमाणे आर. व्ही. जाधव, व्ही. एल. सोनवणे, व्ही. एल. पाटील आणि ठाकूर या चार अधिकाऱ्यांनी त्यांना छळले होते. त्यांच्या कामाचा भाग नसताना देखील भूमापन मोजणी, गावठाण मोजणी, अपील, कोर्ट, भूसंपादन या कामासांठी वापरले. व्ही. एल. पाटील यांनी काम काढून घेतल्यानंतर बाजूला सारले. ‘मला न्याय द्या’ अशी आर्त हाक त्यांनी या निवेदनातून व्यक्त केली होती. निवेदनावर काही कार्यवाही होण्याच्या आतच त्यांनी आत्महत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago