अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकट कोसळले आहे. याआधीच अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदार आणि कांदा उत्पादकांना याच मोठा फटका बसला आहे.
सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे काढायला आलेला कांदा खराब झाला आहे. नासलेला कांदा हा विकला जात नाही अशी परिस्थिती आहे. जो काही कांदा विकला गेला त्याला क्विंटलमागे खूप भाव मिळाला आहे. अशाच एका शेतकऱ्याला कमी भाव मिळाल्यानं आता सरकारचे १३ वं घालावे का ? अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. ”
या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? “: असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…