ताज्याघडामोडी

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत.

या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाचं वय 66 असून दुसरा व्यक्ती 46 वर्षाचा आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago