एक अतिशय धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात पाठवणीनंतर सासरी जाणाऱ्या नवरीवर गोळी झाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कारला ओव्हरटेक करत गाडी थांबवली, नवरदेवाला गाडीतून खाली उतरवलं आणि यानंतर नवरीच्या गळ्यावर गोळी झाडली. हल्लेखोरांनी नवरदेवाच्या भावाची सोन्याची साखळीही हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला.
ही घटना हरियाणाच्या रोहतक येथील असून जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या ट्रामा सेंटरमध्ये भर्ती केलं आहे. नवरीची प्रकृती गंभीर असून पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सांपला गावात राहणाऱ्या तरुणीचं भाली आनंदपूर गावातील एका युवकासोबत झालं होतं. शुक्रवारी पाठवणीनंतर नवरी आपल्या सासरी निघाली होती. कार नवरदेवाचा भाऊ सुनिल चालवत होता. रात्री सुमारे बारा वाजता गावातील शिव मंदिराजवळ पोहोचताच मागून एका इनोव्हा कारमध्ये तिघे आरोपी आले. त्यांनी गाडीला ओव्हरटेक करत कार थांबवली आणि नवरीला गोळी मारली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला नवरीचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांनीच घडवून आणला. पोलिसांनी नामांकित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तपासात पोलिसांना असंही समजलं की हल्लेखोर सांपला येथूनच वधूच्या गाडीचा पाठलाग करत होते.
मात्र वधू सासरच्या गावी पोहोचताच त्यांनी हा हल्ला केला. घटना घडल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे आणि कुटुंबीयही चिंतेत आहेत. पोलिसांचं असं म्हणणं आहे की लवकरच आरोपींना अटक करू. पोलिसांना हेदेखील समजलं आहे की घटनेत वापरण्यात आलेली इनोव्हा हल्लेखोरांनी सांपला गावातीलच एका विट भट्टीच्या मालकाकडून बंदुकीच्या धाकावर हसकवून घेतली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…