कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विजय तळेकर या विद्यार्थ्यांची दुरसंचार विभागात कार्यरत असलेल्या वोडाफोन या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
वोडाफोन हि एक बहुराष्ट्रीय दुरसंचार कंपनी आहे. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय तसेच जागतिक मुख्यालय न्युबरी, बर्कशायर, इंग्लंड या देशात आहे. या कंपनीची सेवा प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशनियामध्ये सेवा देणारी कंपनी आहे.याशिवाय मोबाईल नेटवर्क नागरिकांना उपलब्ध करून देणारी वोडाफोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या विजय भास्कर तळेकर या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन वोडाफोन कंपनीकडून विजय तळेकर या विद्यार्थ्यांला ११ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असते. या मेहनतीचे फळ म्हणून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी कॅम्पस मुलाखतीतून निवड जात आहेत.
“वोडाफोन” या कंपनीत विजय तळेकर यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…