ताज्याघडामोडी

फॅबटेकच्या ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अजित घुटुकडे, अनिल साबळे, संदीप लवटे, संकेत पवार,सुजितकुमार कदम,वैभव दिघे, गणेश सागर अशा एकूण ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.

 रेडिएन्ट इंडस्ट्री हि पुणे येथील नामांकित कंपनी आहे. हि कंपनी विंड एनर्जी, फॅब्रिकेशन सेटअप, डिफेन्स मधील मशिनरींना पार्टस बनवून देण्याचे कार्य करते अशी माहिती कंपनेचे एचआर हरीश गोसावी व कृष्णदेव निकम यांनी निवड प्रक्रये दरम्यान दिली.या निवड प्रक्रियेसाठी कंपनेचे एच आर हरीश गोसावी, व कृष्णदेव निकम व त्यांची टीम संपूर्ण टीम उपस्थित होती.

यावेळी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर उपस्थित होते.निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.संजय पवार, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, पदवीचे ट्रेनिंग व प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago