उस्मानाबाद आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आगार व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अजूनच चिघळणार असल्याचं दिसत आहेत.
आगारात गेल्या बावीस दिवसांपासून एसटी महामंडळात राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सरकारनं भरघोस पगार वाढ केली असूनही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद आगारातून काही गाड्या सोडल्या जात होत्या. दरम्यान एक बस वाहक चक्कर येऊन कोसळला आणि ही बातमी जेव्हा एसटी कामगारांना समजली, तेव्हा त्यांनी आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील यांना मारहाण केली.
कर्मचाऱ्यांनी पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करत त्यांची कपडे देखील फाडली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोन वाहक आणि एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…