सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा 57 हजार 80 रुग्णांना लाभ

 

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपक वाघमारे यांनी  1 एप्रिल 2020 पासून आज पर्यंतच्या अमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे तपशीलवार माहिती दिली आहे.   

गोरगरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारपणात  उपचारासाठी  मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार सेवा मिळावी तसेच  रुग्णांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य शासन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना राबवित आहे.  सोलापूर  जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासून  7 हजार 78 कोरोना बाधित तर 50 हजार दोन  विविध आजार अशा एकूण 57 हजार 80 रुग्णांनी  या योजनतून लाभ घेतला आहे.

            महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सोलापूरसह तालुक्यातील कोरोना बाधित तसेच विविध प्रकारच्या उपचारासाठी  रुग्णांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातून 1 एप्रिल 2020 पासून   7 हजार 78 कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी  19 कोटी 56 लाख  16 हजार 750 रुपये मंजूर करण्यात आले  असून , यापैकी 10 कोटी 64 लाख 10 हजार 490 रुपये संबधित रुग्णालयांना शासनाकडून देण्यात आले आहेत.  तर  विविध  आजारांच्या  50 हजार 02 रुग्णांच्या  उपचारासाठी 80 कोटी  15 लाख 53 हजार 339 मंजूर करण्यात आले आहेत. तसेच या योजनेतंर्गत म्युकर मायकोसिससाठी 19 प्रकारच्या उपचारांचा समावेश असून यामध्ये 11 सर्जिकल व 8 औषध उपचारासाठी समावेश करण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून औषधांचा मोफत पुरवठा करण्यात  येत आहे. या रुग्णांसाठी  1 लाख 50 हजार  रुपयांपर्यंतचा खर्च विमा कंपनी देणार असून, त्यावरील होणार सर्व खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटी देणार आहे.

                सोलापूर शहर व जिल्ह्यातील 45 रुग्णालयांचा महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 6 शासकीय व खाजगी 39 रुग्णालयांचा समावेश आहे.  सध्या 45 रुग्णालयांपैकी 23 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार देण्यात येतात.  यामध्ये5 रुग्णांलयात म्युकर मायकोसिस आजारासाठी उपचार केले जातात. तसेच 22 रुग्णालयांमध्ये इतर आजारांवर रुग्णांवर उपचार केले जातात.

                    महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकूण  1 हजार 209 विविध आजरावर उपचार केले जातात. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रतिवर्षी  1 लाख 50 हजार तर  आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाख रुपये पर्यंत रुग्णांना लाभ देण्यात येतो. असे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपक वाघमारे यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago