ताज्याघडामोडी

तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ४० वर्षीय तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण बोराटे (वय ४१,रा.सातारा गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव असल्याची माहिती सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यता घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी सायंकाळी उशिरा बोराटे यांचा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

चिठ्ठीतला मजकूर जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण यांनी त्यांच्या विभागातील अन्याय करणाऱ्या वरिष्ठांबाबत चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. त्यात महसूल विभाग, तलाठी कार्यालयातील एकूण १३ वरिष्ठ अधिकारी, त्यांचे सहकारी व तलाठी संघटनेचे नाव असल्याचा संशय आहे. सोमवारी आम्ही त्यावर कारवाई करू, असे आश्वासन पाेलिसांनी दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत रात्री अंत्यसंस्कार केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago