कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत.
त्यातच येत्या दोन दिवसात राज्यात प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे व्हेरिएंट आढळल्यानंतर शाळा सुरु होणार की नाही यासाठी संभ्रम निर्माण झाला. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रात तूर्तास तरी काही प्रभाव नसल्याने चिंतेचा कारण नाही मात्र काळजी घेणं गरजेचं असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर शाळा उघडण्याच्या निर्णयाबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार असल्यासाचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.
अजून तरी ओमिक्रॉनच्या संदर्भातली राज्याला अजूनही कुठलीच भीती नाही. कारण त्याचं अजून कुठेही लागण झाल्याचं दिसत नाही.
तसा कोणत्याही जिनोम स्विकिंगचा रिपोर्ट नाही. त्यामुळे त्याची आज चिंता बाळगण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एवढ्या पद्धतीनं लागण झाली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, शाळा ही ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार 1 डिसेंबरला सुरू होईल. शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…