प्रशासकीय मान्यतेबाबत कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टीचे दिवशी कामकाज सुरू ठेऊन विविध विभागाचे प्रश्न मार्गी लावले आहे. येत्या दहा दिवसात ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय मान्यता न दिलेस ग्रामसेवकांना कारवाईला सामोरे जा अशा सुचना दिले तप विभागीय चौकशी ला सामोरे जा अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी परखड शब्दात दिल्या.
सिईओ यांचे दालनात वाॅर रूम करणेत आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. आॅनलाईन व्हीसी द्वारे संवाद साधणेत आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता डी एफ कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटोकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत ज्या १५ लाखाचे खालील ९४ कामांचे प्रशासकीय व कार्र्यारंभ आदेश देणेस दिरंगाई केली आहे. त्या ग्राप मधीस कामे तात्काळ पुर्ण करीम घेणेचे सुचना गटविकास अधिकारी यांना दिल्या. लोकांना पाण्या पासून वंचित ठेवणारे ग्रामंराचयतींना कारवाईस सामोरे जावे लागेल. तालुका स्तरावर सार्वजनिक शौचालयास प्रशासकीय मान्यता कार्यारंभ आदेश देणेस दिरंगाई होत असले बाबत तालुका स्तरावरील अधिकारी यांना फैलावर घेतले. ज्या कामांचा राज्य स्तरावर वारंवार आढावा होतो. या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे मात्र तालुका स्तरावरील दिरंगाई मुळे जर उशीर लागत असेल खपवून घेतले जाणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम प्रभावी पण राबवा. अशा सुचना दिल्या.

कोविड डोसचे नियोजन करा-
……..
लसीकरणा मघ्ये सोलापूर जिल्हा मागे असले बाबीत सिईओ स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींनी कोरोना काळात चांगले काम केले मग लसीकरणत मागे का? या पुढे दोन डोस घेतलेच् प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे सिईओ यांनी सांगितले. जिल्हा लसीकरण अधिकारी पिंपळे यांनी मुबलक प्रमाणावर लय उपलब्ध असल्याचे सांगितले.
माझी वसुंधरा अभियानात हयगय नको – सिईओ स्वामी
माझी वसुंधरा अभियान राबविणे साठी देणेत आलेल्या सुचनांचे पालन करा. या कामात दिरंगाई झालेस क्षेत्रीय अधिकारी यांना जबाबदार धरणेत येईल. येत्या चार दिवसात विभागीय आयुक्त पुणे येथे याबाबत गटविकास अधिकारी यांचा आढावा घेणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी कामातील. संथगती बाबत नाराजी व्यक्त केली.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी अभिप्राय द्या
…………………………..
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचारी यांची मोबाईल वरील अॅप मधून स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी अभिप्राय द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी केले. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व अंगणवाडी सेविका व आरोग्य सेवक व कर्मचारी यांचे सह जे जे जिल्हा परिषदे मधून व ग्रामपंचायती मधून पगार घेतात ते सर्व जण या मध्ये सहभागी होतील अशा स्पष्ट सुचना दिल्या.

घरकुल सर्व्हे व बांधकामांना गती द्या – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
सोलापूर जिल्ह्लात नव्याने घरकुलाचा सर्व्हे करणेत येत आहे. हे काम वेळेत संपणे आवश्यक आहे. घरकुलांची बांधकामे तातडीने पुर्ण करा. योग्य नियोजन करून त्या साठी पाठपुरावा करा.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शिबीरातून मिळणार जातीचे दाखले
…………….
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे अंतर्गत येणारे सर्व वयतीगृहातील विद्यार्थी यांना जातीचे दाखले शिबीरातून देणेत येणार आहेत. पालकांनी वयतीगृह अधिक्षक यांचे कडे कागदपत्रे जमा करावीत अशा सुचना दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago