जळगाव : शहरात चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आज रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज उखर्डू खाचणे (वय २७, रा. गोपाळपुरा) असं मृत तरुणाचं नाव आहे. पत्नी, सासू, सासरे आणि पत्नीच्या भावाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि होणाऱ्या त्रासामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
पंकज खाचणे याचे आयटीआयचे शिक्षण झाले होते. तो वेल्डींग काम करत होता. आयटीआयचे शिक्षण घेत असताना पंकज व चंचल यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. चंचल मूळ भुसावळ येथील आहेत. दोघांना दीड वर्षांचा मुलगाही आहे.
मृत पंकजच्या नातंवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन भांडण होऊ लागले. त्यानतंर चंचलने पंकजच्या आईसोबत उद्धटपणे वर्तणूक सुरू केली होती. भांडण झाल्यानंतर चंचलचे आई-वडील जळगावात येऊन तिला घेऊन जात होते. काही दिवसांनंतर पंकज पुन्हा समजूत काढून परत आणत होता. आता गेल्या २० दिवसांपासून चंचल माहेरी गेली होती. तेव्हापासून ती पंकजचे फोन उचलत नव्हती. मुलाशी देखील बोलणे करून देत नव्हती. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पंकजने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचंही पंकजच्या नातेवाईकांनी सांगितलं.
दुपारी १२ वाजता पंकजच्या आई कल्पना या घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पंकजच्या जवळ आढळून आलेली सुसाईड नोट तपासासाठी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत पंकजच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई कल्पना, लहान भाऊ दर्शन, आजी असा परिवार आहे.
काय आहे सुसाई़़ड नोटमध्ये?
‘मी पंकज खाचणे आत्महत्या करतोय. माझी बायको चंचल हिच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला चंचल आणि तिचा भाऊ राहूल पांडव जबाबदार आहेत. मी वारल्यानंतर त्यांना मोठी शिक्षा व्हावी, मी चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला पण आमच्यात नेहमी भांडणे व्हायची.
माझ्या पत्नीला भांडण करण्यासाठी तिचा भाऊ व आई उकसावत असे. चंचलचा बाप पोलीस असल्याने नेहमी मला पोलिसांच्या धमक्या द्यायचे. तिचा भाऊ माझ्या घरी येऊन मला, माझ्या आईला व आजीला ठार मारण्याच्या धमक्या द्यायचे. तसंच एकदा मला भुसावळमध्ये त्याने व चंचलच्या बहिणीने खूप मारहाण देखील केली. मी वारल्यानंतर माझा मुलगा माझ्या आईजवळ राहील हीच माझ्या आत्म्याला शांती असेल,’ असं मृत तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…