सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आशुतोष चव्हाण या विद्यार्थ्यांची कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
कॉग्निजेंट हि बिजनेस कन्सल्टिंग आयटी कंपनी असून वेगवेगळ्या आऊट सोर्सिंग सर्व्हिसिंग देण्याचे कार्य करते. या कंपनीचे मेन ऑफिस यूएसए मध्ये असून भारतात देखील मोठे काम सुरु आहे. अशी माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागा प्रमुख प्रा.संजय पवार यांनी दिली.
निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागा प्रमुख प्रा.संजय पवार, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर, पदवीचे प्लेसमेंट कॉ-ऑर्डिनेटर प्रा. शैलेश इटकलकर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…