ताज्याघडामोडी

सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

सोलापूर- पुणे महामार्गावर  टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला . भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू आहे. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात  आले आहे.

रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर – पुणे महामार्गावर शनिवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. मळीने भरलेला ट्रँकर इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला होता. तर तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक सोलापूरकडून पुण्याकडे येत होता. भिमानगर परिसरातील एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. सोलापूर- पुणे महामार्गावर असलेल्या भीमा नदीच्या पुलावर इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टँकर चालकाचा ताबा सुटून वाहन प्रथम दुभाजकावर आदळले व नंतर ट्रक आणि टॅंकरची धड झाली.

दोन तास वाहतुकीचा खोळंबा

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थाळाकडे धाव घेतली. स्थानिकाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची अद्याप ओळख समोर आलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने रोडच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago