फिर्यादीचे वडील वडील विठ्ठल मंदीरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.श्याम कोडींबा शेलार रा सह्याद्री नगर इसबावी पंढरपूर हे वारंवार विठ्ठल मंदीरात दर्शनासाठी येत असल्याने फिर्यादीच्या वडीलांची त्यांचेबरोबर ओळख झाली.ओळखी झाल्यामूळे श्याम शेलार यांनी बरेचसे मूलांना त्यांनी रेल्वेत कामाला लावले आहे असे सांगत त्यांचेकडील मूलांना रेल्वेत नोकरीला लावलेले व मूलांची निवड झालेले स्टेटस असे इतर कागदपत्र फिर्यादीचे वडीलांना दाखवले व विश्वास संपादन केला. त्यानंतर ते फिर्यादीचे घरी घऱी येउ जाउ लागले.घरी आल्यावर त्यांनी फिर्यादीस रेल्वेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले.
त्याबदल्यात आम्ही त्यांना 06,50,000/- रु (साडे सहा लाख)रुपये देण्याचे ठरले.त्यानंतर फिर्यादी रोज रात्री 09/30 ते 01/00 वा पर्यंत श्याम शेलार यांचे घरी जाउन अभ्यास करुलागले .त्यावेळी सोबत 1) अविष्कार बाळासाहेब माने वय 26 वर्षे 2) सागर प्रकाश कणसे वय 28 वर्षे3) शूभम बाळासाहेब माने वय 21 वर्षे 4) अक्षय मधूकर जठार वय 24 वर्षे 5) तूकाराम गणपत गायकवाड वय 23 वर्षे 6) रुतीक सूनिल लिंगे वय 21 वर्षे 7) नामदेव गणपत गायकवाड वय 24 वर्षे सर्व रा टाकळी रोड पंढरपूर हे देखील सोबत अभ्याक करीत होते.
अभ्यास करतेवेळी फिर्यादीस समजले की श्याम कोंडीबा शेलार यांनी वरील सर्वाना देखील रेल्वेत कामास लावतो म्हणून ठरल्याप्रमाणे प्रत्येंकाकडून 06,50,000/- रु (साडे सहा लाख रुपये) घेतले आहेत.
श्याम शेलार यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने फाईली व पैसे परत द्या असे सांगीतल्यावर सदर शेलार हा टाळाटाळ करू लागला. श्याम शेलार ही घऱी असताना घरी जाउन पैशाची मागणी केली असता त्याने शिवीगाळी करीत पैसे देत नाही तूम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत प्रविण बाळासाहेब मायने यास मारहाण करुन बाचाबाची केली तसेच त्याची शेलार याची बहीण मनिषा दिघे,विशाल ननवरे व किरण ननवरे असे सर्वजन मिळून फिर्यादीस शिवीगाळी करुन दमदाठी केली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेला श्याम शेलार याचा मित्र राजेंद्र सत्यवान घागरे याने वाद मिटविला व श्याम शेलार कडून पैसे काढून देतो असे सांगीतले. श्याम शेलार याने राजेंद्र घागरे याचे बँके अकाउंटवर 07,00,000/-रुपये (सात लाख रुपये)असे थोडे थोडे करुन पाठविले होते ते राजेद्र घागरे याने फिर्यादीस दिले.तसेच इतर मूलांचे थोडे थोडे करुन पैसे परत दिल्याचे मला माहीत आहे.
उर्वरीत पैशाचे मागणी केली असता श्याम शेलार व त्याची बहीण मनिषा दिघे यांनी फिर्यादीच्या घरी येउन तूमचे पैसे देणार नाही तूम्हाल काय करायचे ते करा असे अशी धमकी दिली. वारंवार पैसे मागून आमची फसवणूक होत असल्याने तक्रार दाखल करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.